एपीएमसी बद्दल

पुर्व विदर्भातील अग्रगण्य बाजार समिती

इतिहास - उमरेड हे श्हर प्राचीन व ऐतिहासिक श्हर असुन सोळाव्या शतकात चांदा (सध्याचे चंद्रपुर) येथील गोंड राजे करणशहा यांनी उमरेड हे शहर वसवले. हे शहर आम नदीच्या काठावर वसलेले असुन गावात गोंड राजे करणशहा यांनी बांधलेला एक जुना प्राचीन कील्ला आहे. हा किल्ला पिवळया वालुकाश्म (Red- yellow Sandstone) दगडांनी बांधलेला असुन पुर्वी याला एक मोठी तटबंदी होती. उमरेडचा किल्ला हा गोंड साम्राज्याच्या समृध्द इतिहसाचा एक महत्वाचा पुरावा आहे. मोठे व्यापारी केंद्र होते. हे ठीकाण नंतर भोसले आणी १८५० मध्ये ब्रिटीशांच्या ताब्यात गेले. गावाशेजारी दोन मोठे तलाव असुन या तलावांमध्ये येथे मोठया संख्येने असलेला कोळी समाज शिंगाडयाची (Water Chestnut) लागवड करतो.

व्यापारी केंद्र - या ठीकाणी विणकर समाज मोठया संख्येने असुन येथील रेशीमकाठी धोतर व साडयाकरीता पुर्वि फार प्रसिध्द होते. येथील मीर्ची बाजार अतीशय प्रसिध्द होता. येथील तलावामध्ये शिंगाडयाचे (Water Chestnut) उत्पादन व विक्री मोठया प्रमाणात होते. सद्यस्थिती - सद्यस्थितीत हे शहर उमरेड - कन्हांडला अभयारण्यामुळे, येथे असलेल्या असंख्य रिसोर्ट्स मुळे व सावजी जेवणाकरीता ओळखले जाते. कन्हांडला अभयारण्यामध्ये व्याघ्र पर्यटनासाठी संपुर्ण भारतातुन पर्यटक येतात व येथील रिसोर्ट्स मध्ये थांबतात. तसेच येथील सावजी जेवन अत्यंत प्रसिध्द असुन दुरुन दुरुन लोक येथे सावजी जेवणाचा आस्वाद घेण्याकरीता येत असतात.

कृषि उत्पन्न बाजार समिती, उमरेड, जि. नागपुर ची स्थापना महाराष्ट्र शासन अधिसुचना क्रमांक एपीएम/३०६७/३१९१२ (Third C-B) दिनांक २१/०५/१९७४ अन्वये दिनांक १६/०७/१९४ रोजी झालेली असुन समितीचे प्रत्यक्ष कामकाज दिनांक १२/१२/१९७४ पासुन सुरु झाले. समितीचे कार्यक्षेत्र संपुर्ण उमरेड तालुका (१९१ गावे) असुन समितीचे कार्यक्षेत्रात ३६ प्राथमीक कृषि पत पुरवठा संस्था (PACS) व ४७ ग्राम पंचायती आहेत.

कृषि उत्पन्न बाजार समिीती, उमरेड चे शेतमाल खरेदी विक्री चे व्यवहार सुरुवातीला मंगळवारी पेइ येथील हीरव्या तलावाला लागुन असलेल्या जागेवर होत होते. मार्केट मधील शेतमाल खरेदी विक्रीकरीता सदर जागा अपुरी पडत असल्यामुळे समितीने "नायडु बाजार" या नावाने प्रसिध्द असलेली उमरेड - भिवापुर रोड वर असलेली ४.९१ हेक्टर आर जागा नगर परिषद, उमरेड यांचेकडुन खरेदी करुन त्याठीकाणी शेतमालाचे खरेदी विक्रीचे व्यवस्थेकरीता आवश्यक असलेल्या सर्व पायाभुत व उत्पादक सुविधा निर्माण केल्या. ही जागा कृषि उत्पन्न बाजार समिती, उमरेड चे "मुख्य मार्केट यार्ड" म्हणुन घोषीत करुन या ठीकाणी सन २००० पासुन समितीने शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले.

उमरेड बाजार समिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्तम कार्य करीत असुन शेतकऱ्याकरीता अनेक योजना राबवित आहेत. नैसर्गीक विज, सर्पदंश किंवा पुरात बुडुन मृत्यु पावलेल्या शेतकऱ्यांचे व शेतमजुराचे वारसास आर्थिक मदत करीत आहेत. बाजार समिती व्यवस्थापन अत्यंत काटकसरीने करीत असुन शेतकरी हीतांचे दृष्टीने अनेक निर्णय घेतले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. ही बाजार समिती नेहमीच शेतकरी हीताला प्राधान्य देवुन काम करत आली आहे व येणाऱ्या बदलांना सामोरे जावुन निश्चितच शेतकरी हीत जपण्याचा प्रयत्न बाजार समिती करणार आहे.