दैनंदीन व्यवहाराच्या नोंदी टॅली ई. आर. पी. सॉफ्टवेअरमध्ये संगणकीकृत करुनआर्थिक पत्रके तयार करणे तसेच बँकेशी संबधीत सर्व आर्थिक व्यवहाराचे कामकाज, मुळ अंदाजपत्रक, पुरवणी अंदाजपत्रक व पुनर्विनियोजित अंदाजपत्रक महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांचेकडे मंजुरीकरीता सादर करणे. शासनाला देय असलेले सर्व कर, देयके ईत्यादी रकमांचा विहीत मुदतीत भरणा करणे. लेखा विभागशी संबधीत सव्र कामकाज सांभाळणे.
दैनंदीन बाजार भाव महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे चे वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करणे. जिल्हा साख्यीकी अधिकारी तसेच खात्याकडुन व विविध शासकीय विभागाकडुन वेळोवेळी मागीतली जाणारी आवकेची माहीती तयार करुन सादर करणे.
बाजार समितीचे आस्थापनेवरील सर्व नियमीत कर्मचारी यांचे आस्थापने संबधी सव्र आदेश काढणे, रजा खतविणे, रजेचा हीशोब ठेवणे, शासनाकडुन वेळोवळी जाहीर होणारे महागाई भत्ते, वार्षिक वेतनवाढ, एरीएस यांची गणना करणे.
धान्य बाजार व गुरांचे बाजाराकरीता नविन अनुज्ञप्ती देणे, नुतणीकरण करणे, त्यासंबधीचा रेकॉर्ड ठेवणे, अनुज्ञप्तीसंबधी माहीती विविध शासकीय विभागांना तसेच ऑडीटर यांना उपलब्ध करुन देणे.
समितीचे अनुँ ाप्तीधारक अडत्ये/खरेदीदार व्यापारी यांचे शेतमाल खरेदी विक्रीचे रेकाँर्डची तपासणी करणे. अडत्ये यांचेकडील ईलेक्ट्रॉनिक वजनकाटयाची नियमीत तपासणी करणे, स्टँपींग अद्यावत आहे किंवा नाही यांची तपासणी करणे.
समितीचे गोदामामध्ये शेतमाल तारण याजनेमध्ये व वेअर हाउस योजनेमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवणे, त्याचा स्टॉक रजिस्टर व विक्री रजिस्टर मध्येरेकॉर्ड ठेवणे, कर्ज पकरण तयार करणे, ई आर पी प्रणालीमध्ये एंट्री करणे, कर्ज प्रतिपुर्ती प्रस्ताव तयार करुन पणन मंडळकडे सादर करणे. गोदामामधील शेतकरी व व्यापारी यांचे शेतमालाचा रेकॉर्ड ठेवणे, त्यावर भाडयाची रक्कम गणना करुन वसुल करणे.
शेतमाल खरेदी विक्री चे व्यवहाराच्या पावत्या खरेदीदार व्यापारी यांचेकडुन प्राप्त झालेल्या पावत्यावरुन बाजार फी व देखरेख फी गणना करुन त्याची वसुली करणे, वसुल झालेली फी लेखा विभागाकडे जमा करणे, शासकीय आधारभुत दराने होणाऱ्या कापुस, धान या शेतमालावरील बाजार फी वसुल करुन जमा करणे, बाजार फी व देखरेख फी चा रेकॉर्ड ठेवणे ठेवणे, बाजार फी व देखरेख फी संबधाने वरीष्ठ कार्यालयाकडुन मागीतलेला रेकॉर्ड सादर करणे.
दैनंदीन कार्यालयीन पत्रव्यवहाराचे आवक जावक नोंद घेणे
