एम.ए.सी.पी. योजनेअंतर्गत मुख्य मार्केट यार्ड, उमरेड येथे प्रती ९७२ मेट्रीक टन क्षमतेचे ५ गोडावून असुन त्याचा वापर शेतकऱ्यांचा शेतमाल अल्प व्याज दरात तारण योजना शेतकऱ्यांना शेतमालावर कर्ज योजना चालविली जाते. तसेच शेतकऱ्यांना शेतमाल साठवणुक करण्याकरीता अल्प किराया घेवुन वेअर हाऊस योजना चालविली जाते.
नैस्गीक विज, सर्पदंश किंवा पुराचे पण्यात वाहुन गेल्यामुळे मृत्यु पावलेल्या समितीचे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे वारसास रु. २०,०००/- ची आर्थिक मदत केली जाते.
शेतकऱ्यांना कमी भावात शेतमाल विक्री करावा लागु नये व त्यांना वाढत्या भावाचा फायदा घेता यावा याकरीता म.रा.कृ. पणन मंडळ, पुणे यांचे सहकार्याने शेतमाल तारण योजना राबविण्यात येते.
